भीम जयंती साजरी करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचे महत्वपूर्ण व्यक्तव्य; म्हणाले…

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. त्यातच  देशातील सर्वात जास्त रुग्ण संख्यामहाराष्ट्र असल्याचे दिसत आहे. दरदिवशी कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळाला आहे.

वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून लागू झाले असून, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. याचदरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही याच कालावधीत असून, तो मुद्दा उपस्थित होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे.

काय आहे प्रकाश आंबेडकर यांचे ट्विट

महाराष्ट्र शासनाने पुन्हा लॉकडाऊन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते, त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.