मुंबई – अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज असलेल्या प्राजक्ताचे फॅन्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. सोशल मीडियावर तर चाहते तिच्यावर अक्षरशः आपल्या मनातील भावना व्यक्त करतात कि काय असच वाटत आहे. नुकतंच प्राजक्ताने एक फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळत.
सध्या सिम्पल आणि लो मेकअपमध्ये प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. ज्यात तीने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. चाहत्यांना हा लूक चांगलाच आवडलेला दिसतोय. एकाने कमेंट करत मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणत तिला थेट प्रपोज केलय. अनेकांनी प्राजक्ताचा हा फोटो शेअर देखील केला आहे.
View this post on Instagram
“इतरांच्या सावलीखाली राहण्यापेक्षा मी एकटीच अंधारातून चालेले” असं कॅप्सन यावेळी प्राजक्ताने पोस्ट केलेल्या फोटोला दिल आहे. याबाबत देखील चाहत्यांनी कमेंटमध्ये भाष्य केलं आहे. एकाने म्हंटल तुला दिसावं म्हणून मी तुझ्या मागे एलईडी टॉर्च घेऊन चालत राहील.प्राजक्ताची ही पोस्ट कमेंटमुळे चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. प्राजक्ता सध्या हास्य जत्रा शो होस्ट करत आहे. तर याआधी ती बहुचर्चित वेब सिरीज रानबाजारमध्ये दिसली होती.