मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले. मात्र भाजपविरुद्ध चकार शब्द त्यांनी काढला नाही. उलट मोदी सरकारचं कौतुक केलं. त्यांच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना आता मनोरंजन क्षेत्रातून देखील प्रतिक्रिया आली आहे.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता स्वतः या सभेला हजर होती. ज्याचा व्हिडीओही तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
प्राजक्ताने म्हटलं की, मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नसून खूप दिवसांपासून राजकीय सभा अनुभवायची होती, ती काल पहिल्यांदा अनुभवली. कलाकार होण्याआधी मी माणूस आहे आणि त्याच्या समृद्धीसाठी झटायला हवं. जस फिल्मफेअरला जाणं गरजेचं तसंच हे देखील म्हणून हा घाट अशी प्रतिक्रीया प्राजक्ताने दिली आहे.
View this post on Instagram
राज ठाकरेंच्या भाषणावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र प्राजक्ताने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत.