Prabhas : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास सध्या त्याच्या ‘सालार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘सालार’नंतर प्रभासचा ‘द राजा साब’ या सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या सिनेमाचं धमाकेदार पोस्टर आऊट झाले आहे. संक्रातीच्या दिवशी या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे.
‘द राजा साब’ या सिनेमाच्या पोस्टरमध्ये काळा शर्ट, लुंगी आणि स्लीपर अशा लूकमध्ये प्रभास दिसत आहे. प्रभासने पोस्टर शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पोस्टर शेअर करत प्रभासने लिहिलं की, “सणासुदीच्या दिवसांत ‘द राजा साब’ची पहिली झलक समोर. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा”. सध्या त्याच्या पोस्टरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
View this post on Instagram
प्रभासच्या ‘द राजा साब’ या सिनेमाचे दिग्दर्शन मारुती प्रभास करत असून कथा थमन एस लिहिणार आहेत. या सिनेमात प्रभास अंतरंगी भूमिकेत दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, प्रभासच्या ‘सालार’ने जगभरात 610 कोटींची कमाई केली आहे. प्रभासचा ‘द राजा साब’सह ‘कल्कि 2898’ हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात तो दीपिका पादुकोणसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.