श्रीगोंदा – तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे सव्वादोन लाखांची वीज चोरी उघड झाली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप राधेश्याम सावंत यांच्या फिर्यादीवरून धर्मराज संपतराव काकडे, मोहम्मद सद्दाम, अमीर रज्जाक शेख (सर्व रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) यांच्यावर भारतीय विद्युत कायदा 2006 च्या कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील आरोपींनी वीज वापराची नोंद मीटरमध्ये होणार नाही, अशी फेरफार केली होती. त्याद्वारे त्यांनी 11 हजार 242 युनिटची वीज चोरी केली. त्याची किंमत अधिभारासह दोन लाख 21 हजार 290 रुपये इतकी होत आहे असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. एप्रिल 2019 ते जानेवारी 2021 या काळात ही वीजचोरी करण्यात अली आहे.