बारामती- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून जाणाऱ्या महावितरणच्या 220 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित कामासाठी गुरुवारी (दि. 7) सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बारामती शहर, एमआयडीसी व तालुक्याच्या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. हे काम गुरुवारी (दि. 7) रोजी पूर्ण होणार असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे, तरी या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.