नवी दिल्ली : दिल्लीच्या महापालिकेत भाजप आणि आपच्या नगरसेवकांचा राडा झाल्याचे समोर आल्यानंतर आता या दोन्ही पक्षात पोस्टर वॉर सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेत झालेल्या राड्यावरुन भाजपने एक पोस्टर तयार केले होते त्याला आता आपने भाजप नेत्यांचे पोस्टर बनवून उत्तर दिले आहे.
आपने तयार केलेल्या पोस्टरमध्ये खासदार आणि क्रिकेटर गौतम गंभीर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांचे फोटो असून त्यावर ‘बॅलट चोर मचाए शोर’ असे शीर्षक दिले आहे.
काही तासांपूर्वी भाजपने एक पोस्टर रिलिज केले होते. यामध्ये आम आदमी पार्टीवर टीका करण्यात आली होती. यामध्ये आपच्या नेत्या आतिशी या दिल्ली महापालिकेत ऑर्केस्ट्रा करत असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यानंतर आपने देखील भाजपला प्रत्युत्तर देताना एक पोस्टर रिलिज केले.
BJP वाले जो इतना मचा रहे शोर हैं,
ये ही लोकतंत्र के हत्यारे और Ballot चोर हैं। pic.twitter.com/mfsZyPzqEu— Aam Aadmi Party Delhi (@AAPDelhi) February 25, 2023
यामध्ये खासदार आणि क्रिकेटर गौतम गंभीर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी, नगरसेवक आणि महापौरपदाचे उमेदवार रेखा गुप्ता, चंदनकुमार चौधरी आणि भाजप प्रवक्ते हरिष खुराणा यांचे फोटो असून त्यावर ‘बॅलट चोर मचाए शोर’ असे टायटल दिले आहे. तसेच या पोस्टरला ‘लोकशाहीचे हत्यारे आणि मतपत्रिका चोर’ असे कॅप्शन दिले आहे.
सदन में मारपीट और तानाशाही करवाने वाली AAP की “खल-नायिका” pic.twitter.com/yp3v7Tw2wQ
— BJP Delhi (@BJP4Delhi) February 25, 2023
भाजपनं जे पोस्टर तयार केलं यामध्ये आपचे आमदार अतिषी आणि दुर्गेश पाठक तसेच दिल्लीच्या महापौर शेल्ली ओबेरॉय यांचे फोटो आहेत. भाजपनं हे पोस्टर रिलिज करताना याला कॅप्शन दिलं की, आपच्या ‘खलनायिका’ महापालिकेत हिंसा आणि हुकुमशाहीचा ऑर्केस्ट्रा करत आहे.