पणजी- आताच विवाह बंधनात अडकलेली बोल्ड अभिनेत्री पुनम पांडेला तिच्या नवऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यासाठी तिचा नवरा सॅम बाॅम्बेला गोव्यात अटक करण्यात आली आहे.
आमचं काहीच दिवसापुर्वी लग्न झालं मात्र सॅम बॉम्बेने मला ठार मारण्याची धमकी दिली, मारहाण केली असा आरोप पुनम पांडे हिने तिच्या नवऱ्यावर केले आहेत. याबाबतची सगळी माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अक्षीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे.
पुनम पांडे ही बोल्ड अभिनेत्री म्हणून ओखळली जाते. काही दिवसांपुर्वीच विवाहबंधनात अडकल्याची आनंदाची बातमी तिने तिच्या इंस्टाग्रामवरुन दिली होती. तिच्या अनेक पोस्ट पाहून ती या नात्यात आनंदी असल्याचं दिसतं मात्र तिने नवऱ्यावर केलेल्या या आरोपामागे नेमकं काय कारण आहे. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.