मुंबई – आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘पूजा सावंत’ने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले हॉट अँड ट्रॅडिशनल लूक मधील सर्वच फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्स पर्यंत पोहचवत असते.
नुकतंच पूजाने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, तिच्या या फोटोने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. पूजाने चक्क तलावात झोपून फोटोशूट केल्याचे पाहायला मिळतंय.
सध्या सोशल मीडियावर पूजा सावंतच्या या आगळ्या वेगळ्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.
आपल्या उत्तम अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंतची आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते.