सातारा – भारतीय लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया देशभरात सुरू असून तिसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहे.
मतदान ही प्रक्रिया लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी सातारा शहरासह उपनगरातील महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर मतदानाची खूण दाखवताना आ. पृथ्वीराज चव्हाण व सौ. सत्वशिला चव्हाण.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्नी वेदांतिकाराजे भोसले तसेच मुलीसह मतदान केले.
आधी मतदान…. मग लगीन….
जिल्हाधिकारी अन् “झेडपी’ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही बजावला मतदानाचा हक्क
समाजात अनेकजण मतदान करत नाहीत. मात्र दोन्ही पायांनी अपंग असताना प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या साताऱ्यातील बाळासाहेब शेवडे यांनी मंगळवारी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला तसेच सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सावात सहभागी होऊन मतदान करण्याचा संदेश दिला.
मतदान हा दिवस खऱ्या अर्थाने मतदारासाठी राजा म्हणून जगण्याचा दिवस. मंगळवारी लोकसभेसाठी झालेल्या मतदानाला वृद्ध तसेच दिव्यांग मतदारांसाठी रिक्षास्वरूपी रथाची सोय करण्यात आली होती.