काश्‍मीरमध्ये दगडफेकीनंतर आयटीबीपीचे वाहन उलटले; चालकाचा मृत्यू

श्रीनगर – दक्षिण काश्‍मीरमध्ये मंगळवारी भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) जवानांना घेऊन जाणारे वाहन उलटले. त्या दुर्घटनेत कॉन्स्टेबल दर्जाचा वाहन चालक मृत्युमुखी पडला, तर चार जवान जखमी झाले. निवडणुकीच्या बंदोबस्तावरून परतत असताना आयटीबीपी जवानांच्या वाहनावर जमावाने दगडफेक केली. त्या दगडफेकीनंतर वाहन उलटले. त्यात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव हिलाल अहमद बट असे आहे. ती दुर्घटना श्रीनगरपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोकरनाग परिसरात घडली. दगडफेकीची माहिती समजताच अतिरिक्त सुरक्षा बळ घटनास्थळी पोहचले. त्या सुरक्षा पथकांनी आयटीबीपीच्या जवानांना दगडफेकीपासून वाचवून सुरक्षित स्थळी पोहचवले. सुरक्षा जवानांवर स्थानिकांच्या जमावांकडून दगडफेक केली जाण्याच्या घटना काश्‍मीरमध्ये वारंवार घडतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.