बलात्काराच्या आरोपीला पोलिसांनी घातल्या गोळ्या

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशमधील रामपूरमध्ये काही दिवसांपूर्वी (६मे) एका सहा महिन्याच्या लहान मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करत तिची हत्या करण्यात होती. या प्रकरणातील हत्येचा मुख्य आरोपी नाजिलला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आणि गुंडांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये आरोपीला अटक करण्यात आले आहे.

रामपूरचे पोलीस अधीक्षक आणि एनकाऊंटर स्पेशलिस्ट ‘अजय पाल शर्मा’ यांनी चकमकीदरम्यान आरोपीच्या दोन्ही पायावर गोळ्या घालत पकडले आहे. त्यानंतर, एसपी अजय पाल शर्मा यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here