वाघोली, (प्रतिनिधी) -वाघोली येथे डोमखेल रोड कमानीजवळ 5 किलो 440 ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगणार्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्यावर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्याकडून गांजा, मोबाईल असा 1 लाख 19 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. अभिषेक गोरख पवार (वय 20, रा. लोणीकंद) असे गांजा बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगणार्या तरुणाचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक 2 व लोणीकंद पोलिसांनी संयुक्तिक ही कारवाई केली आहे.