Video : पोलीस मित्राने हॉटेलमालकाला गाडीच्या बोनेटवर नेलं फरफटत, फुकट जेवणासाठी दमबाजी

नाशिक – पोलीस मित्राने आपण अधिकारी असल्याचे सांगून फुकट जेवणासाठी हॉटेलचालकाला दमबाजी करत हॉटेल मालकाला कारच्या बोनेटवर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नाशिक शहरातील इंदिरानगर येथील हॉटेल हरी ओम ढाबा येथे घडला आहे. दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास हॉटेल हरी ओममध्ये एका तोतया पोलीस मित्राने धिंगाणा घातला होता. आपण पोलीस मित्र आहोत, अशी दमबाजी तो हॉटेल मालकावर करत होता.हॉटेलमध्ये 1600 रुपये जेवणाचे बिल झाले होते. पण हे पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करत होता.

हा फुकट्या आपण पोलीस मित्र असल्याचे सांगत होता. त्याला हॉटेल मालकाने ओळखपत्र विचारले असता, त्याने ते दाखवत अधिकारी असल्याची बतावणी देखील या केली होती.

त्यानंतर बिल न देताच तो हॉटेलच्या बाहेर पडला आणि गाडीत बसला. हॉटेलच्या मालकाने गाडीसमोर येऊन त्याला थांबण्यास सांगितले. पण पठ्या काही थांबायचे नाव घेत नव्हता. हॉटेल व्यवसायिकांला संशय आल्याने त्याने स्थानिक पोलिसांना फोन करताच तोतया पोलिसाने पळ काढला. यावेळी हॉटेल मालकाला गाडीच्या बोनटवर त्याने फरफटत नेलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.