बिबवेवाडी परिसरात लसीकरण मोहिमेला महिलांचा प्रतिसाद

पुणे : बिबवेवाडी परिसरात करोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या जास्तीत जास्त लोकांना लसीकरणाचा लाभ घेता यावा या उद्देशाने विजयादशमीच्या मुहूर्तावर युवा कार्यकर्ते गौरव घुले यांच्या वतीने विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेस महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

महेश सोसायटी येथील गॅस गोडाऊन जवळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत लसीकरण शिबिर भरविण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्‍टर, नर्सेस, उत्तम नियोजनामुळे शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जवळपास 250 पेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केले. सणाचा दिवस असूनही लगेच लस मिळत असल्याने महिलांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती.

उपस्थित असलेले डॉक्‍टर्स, नर्सेस यांच्या कार्याला सलाम म्हणून यांचा सत्कारही करण्यात आला. विजयदशमीच्या मुहूर्तावर लोकांना चांगले आरोग्य लाभावे या निमित्ताने केलेला हा प्रयत्न आहे. नागरिकांनी उत्तमप्रकारे सहकार्य केले असून या भागातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे घुले यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.