हैदराबाद एन्काऊंटर: नेमके काय झाले? पोलिसांची पत्रकार परिषद

आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार- पोलीस

हैदराबाद : हैदराबाद चकमकीत सायबराबाद पोलिसांनी अनेक खुलासे केले आहेत. सायबराबादचे पोलिस आयुक्त व्ही. सज्जनार म्हणाले की, 27-28 नोव्हेंबरच्या रात्री दिशावर सामूहिक बलात्कार केला गेला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. यानंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला. आम्ही वैज्ञानिक पुरावे गोळा केले आणि या चारही आरोपींना नारायणपेट येथून अटक केली. आणि आरोपींना रिमांडमध्ये घेतले होते.

पोलिस आयुक्त व्ही. सज्जनार म्हणाले की, 10 पोलीस आज आरोपींना क्राइम सीन रीक्रिएट करण्यासाठी घेऊन आले होते. यावेळी आरोपींनी पोलिसांकडून दोन शस्त्रे हिसकावली. यानंतर पोलिसांनी आरोपींना इशारा दिला पण त्यांनी पोलिस पथकावरच गोळीबार सुरू केला. आणि दगडफेकही केली. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या प्रतिउत्तरात 4 आरोपी ठार झाले.

पत्रकार परिषद घेताना पोलिस आयुक्त व्ही. सज्जनर म्हणाले की, 4 व 5 डिसेंबर रोजी आम्ही चार आरोपींची चौकशी केली. या चौकशी दरम्यान आरोपींनी मोबाइल, पॉवर बँक आणि घड्याळ याबद्दल सांगितले. या वस्तू परत मिळवण्यासाठी आणि क्राइम सीन रीक्रिएट करण्यासाठी आम्ही आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते.

15 मिनिटे चालली चकमक

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, चारही आरोपींना हातकडी घातली नव्हती. यामुळे चार आरोपींनी पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेतले. यानंतर ते पळून जाऊ लागले. सुरुवातीला आम्ही त्यांना इशारा दिला पण त्यांनी उलट गोळीबार सुरू केला. यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. पहाटे 5.45 ते सकाळी 6 च्या दरम्यान 15 मिनिटांच्या चकमकीत हे चार आरोपी ठार झाले.

दोन पोलिसही झाले जखमी

चकमकीदरम्यान दोन पोलिसही जखमी झाल्याचा आयुक्तांचा दावा आहे. यात एक उपनिरीक्षक आणि एक हवालदार समाविष्ट आहे. महबूबनगर रुग्णालयात आरोपीचे शवविच्छेदन केले जात आहे. आम्ही डीएनए प्रोफाइल घेतला. आम्हाला वाटते की या चौघांनी कर्नाटक आणि तेलंगणामध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडवून आणल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.