#PL : मॅनचेस्टर युनायटेडचा टाॅटेनहॅमवर २-१ ने विजय

लंडन : मार्कस रशफोर्ड याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर मॅनचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये टाॅटेनहॅमचा २-१ ने पराभव करत विजय संपादित केला. दुस-या सामन्यात लिव्हरपूलने एवर्टनचा ५-२ ने पराभव करत गुणतालिकेत अव्वलस्थान कायम राखले आहे.

लीगमध्ये दुस-या स्थानावर असलेल्या लीसेस्टरने शेवटच्या स्थानावर असलेल्या वाटफोर्ड संघाचा २-० ने पराभव केला. लागोपाठ झालेल्या दोन पराभवानंतर चेल्सी संघाने एस्टन विला संघाचा २-१ असा पराभव केला.

लीगमध्ये लिव्हरपूलच्या संघाने १५ सामन्यात ४३ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. तर १५ सामन्यातील ३५ गुणांसह लीसेस्टर दुस-या स्थानी आहे. चेल्सीने १५ सामन्यात २९ गुण मिळवत चौथे तर मॅनचेस्टर युनाईटेडने १५ सामन्यात २१ गुण कमावत सहावे स्थान प्राप्त केलं आहे. टाॅटेनहॅमचा संघ २० गुणांसह आठव्या स्थानी विराजमान आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.