वाघोली – पी एम आर डी ए ने जाहीर केलेला विकास आराखड्याच्या रिंग रोड , पुणे नाशिक रेल्वे , पीएमआरडी रेल्वे व नव्याने केलेले रहिवासी व इतर झोन या चुकीच्या गोष्टी जनतेला लक्षात आणून देण्यासाठी व या विकास आराखड्यास विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाडेबोल्हाई, ता. हवेली येथे जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या जनजागृती मेळाव्यात हरकत कशी घ्यावी, नक्की विकास आराखडा म्हणजे काय आहे,मेळाव्याच्या ठिकाणी हरकतीचा मसुदा/फॉर्म बाबत मार्गदर्शन,नागरिकांसाठी नकाशे उपलब्ध करून देण्यात आले होते.
याप्रसंगी पुणे जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळाभाऊ भेगडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे,संघटन सरचिटणीस भाजपा पुणे अॅड. धर्मेंद्र खांडरे, राज्य कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंद्रे, कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भोंडवे, सुदर्शन चौधरी, हवेली तालुका भाजपा अध्यक्ष सुनील कांचन, पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, राज्य कार्यकारणी युवा मोर्चा सदस्य गणेश कुटे, पुणे जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव, हवेली तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव पाटील, प्रदीप सातव, गणेश सातव, अमोल शिवले, विक्रम गायकवाड, रविंद्र वाळके, विपुल शितोळे, मंगेश गावडे, सुप्रिया गोते, सचिन जाधव, विकास जगताप, श्रीकांत कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील कांचन व पंचायत समिती सदस्य शामराव गावडे यांनी केले होते.