पुणे -वर्धापन दिनानिमित्ताने 1 मे पासून पुणे महानगर परिवहन महामंडाळाकडून धार्मिक व पर्यटन स्थळांकरीता बस सुरू करण्यात आली होती. मात्र, या सेवेचे दर अधिक असल्याने याला प्रतिसाद मिळाला नाहीच शिवाय, तिकिट दर कमी करण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. अखेर दोन दिवसांत या सेवेचा दर पीएमपीकडून 50 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.
वातानुकूलित ई-बसव्दारे विशेष बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू करण्यात आली आहे. आधी यातील सहा मार्गांचे दर जवळपास 1 हजार रुपये होते. हा दर आता 500 रूपये असणार असून, दुसऱ्या एका मार्गाचा दर 700 रुपयांवरून 500 रूपये करण्यात आला आहे.
या मार्गावर 700 ऐवजी 500 रुपये तिकीट
पर्यटन बससेवा क्र. 5 – पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन.
पर्यटन बससेवा क्र. 7 – भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड), प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्ती निगडी.