‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाची बॉक्सऑफिसवर इतकी कमाई

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट निवडणूक काळात आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला होता. त्यामुळे या चित्रपटाला प्रदर्शनासाठी लवकर मुहूर्त मिळत न्हवता. अखेर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (२४ मे) दुसऱ्याच दिवशी पीएम नरेंद्र मोदी चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश पाहता मोदींवरील चित्रपटाला तुडुंब प्रतिसाद मिळेल, असा सिनेक्षेत्रातील जाणकारांचा अंदाज होता.
मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्सऑफिस सुमारे अडीच कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बाबतीत मोदींची जादू चालली नाही असे म्हणता येईल. या चित्रपटात पंतप्रधान मोदींचा संपूर्ण जीवनपट दाखवण्यात आला आहे.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.