पुणे : पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून जनतेला समर्पित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान आपल्या पुणे दौऱ्याची सुरुवात ही दगडूशेठ गणपती दर्शनाने करणार आहेत. सकाळी 11 वाजता मोदी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यासाठी मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पहा सर्व बातम्या एका क्लिकवर
महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचा विकास होईल – नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचा विस्तार
पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही तिघे एकत्र – देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; पुरस्काराची रक्कम करणार अर्पण
टिळकांनी इंग्रजांना घाम फोडला – शरद पवार
४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदींना प्रदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडीने पंतप्रधान मोदींचा सन्मान करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी पुरस्काराची सर्व रक्कम नमामी गंगा प्रोजेक्टला दिली.
स्टेजवर नरेंद्र मोदी यांच्यासोबत शरद पवार, सुशील कुमार शिंदेही उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी एसपी कॉलेजमध्ये दाखल, मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ मंदिरात पूजा करुन एसपी कॉलेजकडे रवाना
PUNE: दगडूशेठ गणपती मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजेला सुरुवात
-श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भव्य स्वागत ; ‘भारत विश्वगुरु व्हावा’ असा नरेंद्र मोदी यांनी केला प्रधान संकल्प
देश का सपना, विश्वगुरू बने भारत अपना… असा ‘भारत विश्वगुरु व्हावा’ याकरिता महाभिषेकाप्रसंगी प्रधान संकल्प करीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी लीन झाले. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत मोदी प्रभावित झाले.
वायू सेनेच्या विशेष विमानाने पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदींचं पुण्यातील कृषीविद्यालयाच्या हेलिपॅडवर स्वागत केलं. अखेर मोदींचा पुणे दौरा सुरु झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
गणपती दर्शनाने होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची सुरूवात; दगडूशेठ मंदिरात जय्यत तयारी
पुणे: पीएम मोदींच्या दौऱ्यामुळे शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
मोदींच्या पुणे दौऱ्यादरम्यान सामाजिक संघटना आक्रमक; काळे झेंडे दाखवून केला विरोध
PUNE: पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत शरद पवार ठाम
पंतप्रधान मोदी आज पुण्यात; लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने करण्यात येणार सन्मान