PM Modi on death of Pankaj Udhas : आपल्या आवाजाने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.गेल्या काही दिवसांपासून ते आजारपणाचा सामना करत होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
पंकज उधास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही सुपरहिट आहेत. चिट्ठी आयी है,चांदी जैसा रंग,छुपा ना भी नही आता.. अशी अनेक हिट गझल गाणी पंकज उधास यांनी दिली. | PM Modi on death of Pankaj Udhas
पंतप्रधान मोदी यांनी पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासाठी त्यांनी एक ट्विट केलं आहे. “त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही. त्यांनी पुढे लिहिले की, पंकज उधास यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. त्यांच्या गायकीत वेगवेगळ्या भावना होत्या आणि त्यांच्या गझल थेट आत्म्याशी संवाद साधत होत्या. ते भारतीय संगीताचे दीपस्तंभ होते, ज्यांचे सूर पिढ्यानपिढ्या गुंजतील.”
मोदी पुढे म्हणतात,”गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याच्याशी झालेला माझा विविध विषयांवरील संवाद आठवतो.त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती”
We mourn the loss of Pankaj Udhas Ji, whose singing conveyed a range of emotions and whose Ghazals spoke directly to the soul. He was a beacon of Indian music, whose melodies transcended generations. I recall my various interactions with him over the years.
His departure leaves… pic.twitter.com/5xL6Y3Sv75
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2024
कुटुंबीयांनी दिले निधनाचे वृत्त
अत्यंत दुःखद अंतःकरणाने आपणा सर्वांना कळवावे लागत आहे की, 26 फेब्रुवारी 2024 रोजी पद्मश्री पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन झाले अशी माहिती.उधास यांच्या कुटुंबीयांच्या वतीने कळवण्यात आली. | PM Modi on death of Pankaj Udhas