नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शहरातील 11,000 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पाच्या नवीन विभागाचे उद्घाटन केल्यानंतर कानपूर मेट्रोत बसून प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील होते. त्यांनी IIT मेट्रो स्टेशन ते गीता नगर स्टेशन असा प्रवास केला.
हा विभाग IIT कानपूर ते मोती झील सुमारे 9 किमी लांबीचा आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार, कानपूरमधील मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी 32 किमी आहे आणि तो 11 हजार कोटी रुपये खर्चून तयार केला जात आहे.
शहर दौऱ्यात पंतप्रधान 365 किलोमीटर लांबीच्या पाइपलाइन प्रकल्पाचेही लोकार्पण करणार आहेत. या पाईपलाईन प्रकल्पाची क्षमता वार्षिक सुमारे 3.45 दशलक्ष मेट्रिक टन आहे. मध्य प्रदेशातील विना रिफायनरी ते कानपूरमधील पंकी या प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.