पुणे – महावीतरणाचा वीज खर्च परवडत नसल्याने महापालिका तब्बल 300 किलोमीटर अंतरावरून सौर ऊर्जा आणणार आहे. त्यासाठी खुल्या बाजारातून केंद्राच्या एका कंपनीकडून ही वीज ३ रुपये ४० पैसे प्रति युनिट मोजले जाणार आहेत. तर या विजेच्या वहन खर्चासाठी अडीच ते ३ रुपये मोजावे लागणार आहेत.
त्यामुळे ही वीज अवघी २ रुपये स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे वर्षाला महापालिकेची १२ कोटी रुपये बचत होणार आहे. मात्र, त्यासाठी पालिका एसपीव्ही स्थापन करणार असून त्या मध्यामातून 200 कोटींचे कर्ज काढून या प्रकल्पसाठी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे हा विजेचा हट्ट कोणासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्याच वेळी हे पैसे बँकेत ठेवले तरी पालिकेस वीज बचती एवढेच व्याज मिळू शकते त्यामुळे हा दात कोरून पोट भारण्याचा घाट कोणासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.