दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर एक मोठा बदल केला आहे.पंतप्रधानांनी केलेला हा बदल लक्षवेधी ठरत आहे. पंतप्रधानांनी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरील प्रोफाइल फोटो बदलून प्रोफाइलला तिरंगा ठेवला आहे. यंदाचं वर्ष हे स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आहे त्यामुळेच स्वातंत्र्य दिनाच्या आधीच पंतप्रधानांनी प्रोफाईलला तिरंगा ठेवला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले की, “आज 2 ऑगस्टचा दिवस खास आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, तिरंग्याचा आदर करण्याच्या सामूहिक मोहिमेचा एक भाग म्हणून आपला देश ‘हर घर तिरंग्या’साठी सज्ज झाला आहे. मी माझ्या सोशल मीडिया पेजवर DP बदलला आहे आणि मी तुम्हालाही तेच करण्याची विनंती करतो अशा आशयाचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
It is a special 2nd August today! At a time when we are marking Azadi Ka Amrit Mahotsav, our nation is all set for #HarGharTiranga, a collective movement to celebrate our Tricolour. I have changed the DP on my social media pages and urge you all to do the same. pic.twitter.com/y9ljGmtZMk
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2022
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात ‘आझादी का अमृत महोत्सव’ जनआंदोलनात रूपांतरित होत असल्याचे सांगितले होते आणि लोकांना 2 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘तिरंगा’ प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवण्यास सांगितले होते. तिरंग्याची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांना पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. आम्हाला तिरंगा देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी आपला देश त्यांचा सदैव ऋणी राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.