नवी दिल्ली – तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, केरळ आणि गोव्यासहित गुजरातला तडाखा दिला आहे. या वादळामुळं चार राज्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातला तातडीने एक हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यमुळं उर्वरित राज्यांच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळाने थैमान घातलेल्या गुजरातचा आज पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी तातडीने मदत जाहीर केली आहे. तसेच राज्यातील आकलन करण्यासाठी केंद्र सरकार एक आंतर मंत्रालयीन पथक देखील स्थापन करणार आहे. यासह वादळातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार आहे.
PM Modi announces financial assistance of Rs 1,000 crore for immediate relief in cyclone-hit Gujarat
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2021
अहमदाबाद येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील उपस्थित होते. गुजरातमध्ये चक्रीवादळाने मोठं नुकसान झालं आहे. तसेच किनारपट्टीची हाणी झाली आहे.