करोनाबाधितांवर ‘प्लाझ्मा थेरपी’नुसार उपचारांना पुण्यातही परवानगी

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली परवानगी

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वाढती रुग्णसंख्या आणि करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. यासर्व चिंतेच्या वातावरणात करोनाग्रस्त रुग्ण आणि पुणेकरांना दिलासादायक बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा उपचार करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने परवानगी दिली आहे.

पुण्यात करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक वाढताना दिसत आहे. अनेक वसाहतींना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्लाझ्मा थेरपी करोनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे वैद्यकीय पाहणीतून समोर आले होते. त्यामुळे आयसीएमआरने ही थेरपी उपचारासाठी वापरण्यास सुरूवात केली. देशातील अनेक ठिकाणी ही थेरपी वापरली जात असून, मुंबईत प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरली आहे.

पुणे जिल्हा प्रशासनानेही प्लाझ्मा थेरपीचा करोनाग्रस्त रुग्णांवर वापर करण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्याचबरोबर प्लाझ्मा थेरपीची करोनाग्रस्त रुग्णांवर चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. काही आठवड्यांपूर्वी केली होती. प्रशासनाची मागणी मान्य करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी करण्यास आयसीएमआरने परवानगी दिली आहे. तसे पत्र ससूनच्या प्रशासनाला मिळाले असल्याची माहिती एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.