पुणे –केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या दि. 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यासाठी दि. 1 जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीही होणार आहे. यासाठी सद्यस्थितीला पाच केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
परंतु येत्या काही दिवसांत मुलांच्या लसीकरणासाठी 40 लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या मुलांना कोवॅक्सिनच द्यायचे आहेत. कोवॅक्सिनचे सद्या 47 हजार डोस उपलब्ध आहेत. तसेच तीन लाख सिरींजही शिल्लक आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी “बूस्टर’ डोसचेही नियोजन करण्यात येणार आहे.
‘पात्र लाभार्थींची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता 15 ते 18 वयोगटासाठी सुरू होणाऱ्या करोना लसीकरणाची केंद्रांची संख्या 5 वरून 40 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण वेळेत, वेगाने करण्याचा आपला प्रयत्न आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे