पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची शहराध्यक्ष अजित गव्हाणे व इतर नेत्यांनी आज भेट घेतली. यावेळी बुधवारी (दि. 11) खासदार पवार यांना शिष्टमंडळाने शहरामध्ये ईद-ए-मिलाद च्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले असल्याचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.
शिष्टमंडळाने पवार यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, दीपक साकोरे आणि मस्जिदचे मौलाना उपस्थित होते. त्यावेळी पवार यांनी उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले.