पिंपरी – विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 12) थेरगाव परिसरात घडली. विकास विलास माळवे (वय 27, रा. थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी विलास यांच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 33 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेचे लग्न झालेले आहे. तिला दोन मुली होत्या. त्यातील एका मुलीचे आजाराने निधन झाले. विकासला आरोपी महिलेबाबत सहानुभूती वाटत असल्याने त्यांची जवळीक प्रेमात बदलली. त्यानंतर महिलेने विकासकडे वारंवार पैशांची मागणी केली.
विकासला लग्न न करण्याची तसेच लग्न केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विकासने शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास थेरगाव येथील एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.