पिंपरी – इजिप्त येथे होत असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेच्या “सीओपी 28 सिम्युलेशन मॉडेल’ परिषदेसाठी पिंपरी चिंचवड येथील सोनाली झोळ यांची भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे. सध्या जगभर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारत “सीओपी 28 सिम्युलेशन मॉडेल’द्वारे जगाला शांतेतचा संदेश देत आहे.
हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेणे आणि हवामान कृतीसाठी आर्थिक संसाधने एकत्रित करणे यासह हवामान बदलाच्या तातडीच्या आव्हानांना तोंड देणे याविषयी इजिप्त येथे ही परिषद होत आहे. त्यात पिंपरी चिंचवडची सोनाली भारताचे राजदूत म्हणून प्रतिनिधित्व करत आहे. तर, गतवर्षीच्या “सीओपी 27 सिम्युलेशन मॉडेल’चेही सोनालीने प्रतिनिधित्व केले होते. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेणे आणि हवामान कृतीसाठी आर्थिक संसाधने एकत्रित करणे यासह हवामान बदलाच्या तातडीच्या आव्हानांना तोंड देणे हे “सीओपी 28 सिम्युलेशन मॉडेल’चे उद्दिष्ट आहे.
प्रदूषणाचे जगासाठी मोठे संकट ठरले आहे. दर वर्षी सीओपी 28 सिम्युलेशन मॉडेल अरब राष्ट्रांची जागतिक हवामान बदल परिषद चर्चेत येत आहे. विविध देशांच्या प्रतिनिधींना नव्या पिढीची प्रतिनिधी राजदूत म्हणून भारताकडून एकमेव सोनाली प्रदूषणा बद्दल आपले मत मांडणार आहे.
वडिलांच्या नोकरीमुळे तिचे बालपण व शालेय शिक्षण ग्रामीण भागातच झाले. अमरावती विद्यापीठाच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करत तिने आकुर्डी पुणे येथील डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पर्यावरण अभियांत्रिकी मेट्रोलॉजी आणि संगणक अभियांत्रिकी यांचा योग्य प्रमाण उपयोग करत हरित रोजगार निर्माण करायला हवा. एक सक्षम भारत, सदृढ भारत आणि पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे, असे मत सोनाली झोळ हिने व्यक्त केले आहे.