पिंपरीत पादचारी तरुणाला लुटले

पिंपरी – पादचारी युवकाला दोघांजणांनी अडवले. त्याच्यावर कोयता व चाकुने वार करुन मोबाईल व रोख दहा हजार रुपये पळवून नेले. ही घटना 3 जुलै रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील आयुक्त निवास स्थानासमोरील रस्त्यावर घडली. पवन अशोक काळे (वय-24, रा. कुरळी, ता. खेड) असे या युवकाचे नाव आहे. त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरुन अनोळखी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन हा 3 जुलै रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याला अनोळखी चार इसमांनी अडविले. त्याच्याकडील आठ हजार रुपयांचा मोबाईल व खिशातील दहा हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. याला विरोध करताच आरोपींनी त्याला कोयता व चाकुने मारुन जखमी केले व तेथून पसार झाले. पवन याने 5 जुलै रोजी पिंपरी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.