पिंपरी – राज्यातील घरेलू कामगारांना निर्वाह निधी, आरोग्य विमा, सामाजिक सुरक्षा सह इतर लाभ देण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी लढण्याचा निर्णय घेण्यात आला. विधिमंडळाच्या हिावळी अधिवेशनादरम्यान 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे त्यानंतर मुंबई येथे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघाची राज्यस्तरीय बैठक आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे शुक्रवारी (दि.1) पार पडली. यावेळी निमंत्रक राजू वंजारे , संयोजक ज्ञानेश पाटील, कामगार नेते काशिनाथ नखाते ,सर्व श्रमीकचे उदय भट, ठाणेच्या भावना वाघमारे, लातूरच्या भाग्यश्री रणदिवे, नागपूरचे विलास भोंगाडे, सांगलीचे विजय स्वामी, नाशिकच्या शोभा पवार, धुळ्याच्या संजीवनी शिंदे, नगरच्या द्वारका पवार, जालन्याचे राजेश थोरात, पुणे येथून अनिता गोरे, मीरा सपकाळे, सुजाता भोंगाडे, माधुरी जलमुलवर, प्रियंका काटे, अलका पडवळ,सलीम डांगे उपस्थित होते .
राज्यामध्ये घरेलू कामगारांचे मंडळ असून ते निर्जीव झालेले आहे. सरकार याकडे पूर्ण दुर्लक्ष करत असून त्यांना निधी व इतर लाभही देत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये घरेलू कामगारांचे जीवन असुरक्षित झालेले असून त्यांना विविध देण्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर प्रयत्न न झाल्यास मुंबई येथे मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. प्रस्तावना संतोष थोरात यांनी केली. सूत्रसंचालन मीरा सपकाळे तर आभार किरण साडेकर यांनी मानले.