पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यावधी रूपये खर्च करून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, यामधील अनेक कॅमेरे हे बंद अवस्थेतील आहेत. त्यामुळे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणाच व्हेंटीलेटरवर गेले आहेत. महापालिकेने त्वरीत सीसीटीव्ही यंत्रणा दुरूस्त करून कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी मनसेचे पिंपरी विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. यावेळी मनसेचे कर्मचारी सेना अध्यक्ष रुपेश पटेकर, महिला सेना शहर अध्यक्ष सीमा बेलापूरकर, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष राजू सावळे, सागर शिंदे उपस्थित होते.
पालिकेने आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे शहराच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ दुरूस्त करण्यात यावेत, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
फोटो- निवेदन नावाने