- आणखी 943 रुग्णांची भर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांनी 54 हजारांचा आकडा आज (शनिवारी) पार केला आहे. आज शहरात 943 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर गेल्या 24 तासांत उपचारादरम्यान 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 1111 वर पोहोचला आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरात 943 नव्या रुग्णांची नोंद झाली. यामध्ये शहरातील 941 रुग्णांचा समावेश असून शहराबाहेरील 2 जणांना करोनाची लागण झाली आहे. दिवसभरात 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 14 व शहराबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 54 हजार 230 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील महापालिकेची विविध रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 6986 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 941 रुग्णांचाही समावेश आहे.
आज मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील पुनावळे, काळेवाडी, चोविसावाडी, मोशी, चिंचवड, चऱ्होली, वाकड, दिघी, दापोडी, पिंपळे गुरव येथील 14 रुग्णांचा मृत्यू झाला. तर खेड, इंदापूर, सदुंबरे, अहमदनगर, मावळ, चाकण, खडकी येथील 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोणतीही लक्षणे नसलेल्या 820 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 45496 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2458 नवे संशयित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झाले. गेल्या दोन दिवसांतील 2115 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.