जम्मू काश्मीर मध्ये शोपियाँ भागात मतदान केंद्रावर ‘पेट्रोल बॉम्ब’ ने हल्ला

श्रीनगर – लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये आज मतदानाला जोरदार सुरवात झाली आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्‍मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्‍चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये जम्मू काश्मीर मधील शोपियाँचा देखील समावेश असून, येथे यावेळी मतदानाला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. शोपियाँ मधील मतदान केंद्राजवळ ‘पेट्रोल बॉम्ब’ फेकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या हल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती समजते.

दरम्यान, आजच पुलवामा येथील मतदान केंद्राजवळ ‘ग्रेनेड हल्ला’ करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.