लोकसभा निवडणूक 5 वा टप्पा : सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.08 टक्के मतदान

नवी दिल्ली – देशात लोकसभा निवडणुक 2019 पार पडत आहेत. आतापर्यंत चार टप्प्यांमध्ये 374 मतदारसंघांत मतदान पार पडले असून आज लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्‍मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्‍चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशात सरासरी 52.08 टक्के मतदान झाले आहे. बिहारमध्ये 48.12 टक्के, जम्मू काश्मीर 15.51 टक्के, मध्य प्रदेश 54.39 टक्के, राजस्थान 51.99 टक्के, उत्तर प्रदेश 48.87 टक्के, पश्चिम बंगाल 65.01 टक्के तर झारखंड येथे 58.07 टक्के मतदान झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.