नवी दिल्ली – इस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरीडॉर या कंपनीने सिग्नलींगसाठी एका चिनी कंपनीला 470 रुपयांचे कंत्राट दिले होते. हे कंत्राट रद्द करण्यात आल्यानंतर या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
भारताने चीन विरोधात भूमिका घेतल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने चिनी कंपन्यांची कंत्राटे रद्द करण्याच्या सूचना आपल्या विभागातील कंपन्यांना दिल्या होत्या. संबंधीत कंपनीने चार वर्षांपूर्वी काम सुरू करूनही केवळ 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या चिनी कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. या संदर्भातील माहिती जागतिक बॅंकेला दिली आहे.