वाघोली – पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील समस्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सोडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते प्रदीप वसंत कंद यांनी दिली.
पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटात शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत लोणीकंद,वाडेबोल्हाई, तुळापूर, सांगवी सांडस, न्हावी सांडस,डोंगरगाव, बुर्केगाव, बकोरी, पेरणे, अष्टापुर, बिवरी, शिरसवडी, हिंगणगाव, पिंपरी सांडस, शिंदेवाडी, फुलगाव, वढु आदी गावांना भेटी देत त्या गावातील नागरिकांनी विविध समस्यांबाबत निवेदने दिली आहेत.
ह्या निवेदनानुसार शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विभागांमार्फत अधिकाऱ्यांच्या कडे पाठपुरावा करून नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कंद यांनी सांगितले. पेरणे तालुका हवेली या ठिकाणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आपल्या दारी या उपक्रमाबद्दल प्रदीप वसंत कंद यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश ठोंबरे, हवेली तालुका पंचायत समिती सदस्या संजीवनीताई कापरे,हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मधुकर वाळके सर, माजी उपसरपंच बाप्पुसाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य निलेश वामने, संतोष कापरे, माजी सरपंच बाबूशेठ लोंढे, माजी सरपंच शिवाअण्णा वाळके,निलेश वाळके,माजी उपसरपंच प्रकाश कापरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस माधुरीताई वाळके, माजी ग्रामपंचायत सदस्य साईनाथ वाळके, ग्रामपंचायत सदस्यअतुल वाळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष काळूराम ठोंबरे, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर तळेकर, विशाल वाळके, सोमनाथ कोळपे,दत्ता आबा गायकवाड,शांताराम टूले,बाळूशेठ कदम, दीपक वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
“कोरोनाच्या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भाव च्या काळात नागरिकांशी फोन द्वारे संपर्क साधता आला, त्यांना मदत करता आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार अशोक पवार यांचे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप वसंत कंद यांनी घेतलेल्या कार्यकर्ता आपल्या दारी या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यास मदत झाली. नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधता आला. उपक्रम कौतुकास्पद आहे. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यात येणार आहे.”
– दिलीप वाल्हेकर
अध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष