शिरूर मतदार संघातील पाच लाख नागरिकांचे होणार लसीकरण; रविवारी शुभारंभ

चिंबळी – करोनाचा प्रतिबंधक उपाय व नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने शिरूर लोकसभेचे खासदार व जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात 5 लाख नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते खेड तालुक्‍यातील 50 हजार नागरिकांच्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रविवारी (दि. 26) होणार असल्याचे जगदंबा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोल हरपळे यांनी सांगितले.

ही लसीकरण मोहीम सिरम इन्सिट्युट, नोबल हॉस्पिटल व पुणे जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून व शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण खेड तालुका, आंबेगाव, शिरूर, हवेल, भोसरी, हडपसर परिसरात मोफत राबविणार असल्याचे चाकण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जगदंबा प्रतिष्ठाणचे कार्य अध्यक्ष अमोल हरपळे यांनी सांगितले. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, कैलास लिंबोरे, माजी सभापती विलास कातोरे, बाळशेठ ठाकुर, अरुण चौधरी, संध्या जाधव उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.