पुणे: परराज्यात व राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी लाँक डाउनमध्ये अडकलेल्या नागरीकांकडून मोठ्या प्रमाणात पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली जात आहे. शनिवारी सुमारे 24 हजार जणांना पुणे पोलिसांनी प्रवास करण्यास परवानगी दिली.
कोरोनामुळे लागू केलेल्या संचार मनाई आदेशामुळे मागील दिड महिन्यापासून लाखो परप्रांतीय कामगार, बांधकाम मजुर, विद्यार्थी, पर्यटक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक शहरामधाये अडकून पडले होते.
काही दिवसांपुर्वीच राज्य सरकारने परराज्यात व राज्याच्या वेगवेगळ्या भागात जाऊ इच्छिणाऱ्या नागरीकांचा परतीचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे नागरीकांकडून गावी परतण्यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगी परवानगी मागण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार पुणे पोलिसांकडून प्रवासी नागरीकांचे ऑनलाईन अर्ज मागवून पोलिस ठाण्यांपासून ते पोलिस उपायुक्त कार्यालयापर्यंत विविध पातळ्यांच्या पातळीवर वर योग्य काळजी घेऊन त्यांना परवानगी देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.