नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील दोषी पवन शर्मा याने जिल्हा विधी सेवा प्रशासनाने दिलेला वकील नाकारला आहे, अशी माहिती तिहार कारागृह प्रशासनाने दिल्ली न्यायलयात दिली.
अतिरिक्त सत्र न्यायाधिश धर्मेंद्र राणा यांनी त्याला वकील देण्याचे आदेश बुधवारी दिले होते. त्याने चालवलेल्या चालढकलीबद्दल न्या. राणा यांनी असमाधान व्यक्त केले होते. गुुप्ताने त्याचा बकील काढून टाकला. त्याने नवीन वकील नेमण्यासाठी वेळ मागितला होता.
जिल्हा विधी सेवा प्रशासनाने त्याच्या वडिलांकडे त्यांच्याकडील नियुक्त वकीलांची यादी दिली होती. या प्रकरणात फाशी ठोठावलेल्या चार आरोपींपैकी केवळ पवन शर्मा याचीच दुरूस्ती यचिका करायची बाकी आहे. त्याच्याकडे या शिवाय राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा मार्ग बाकी आहे.