जामखेड : व्हॅलेंटाईन ‘डे’च्या दिवशी गैरप्रकार होत असून, याला आळा घालण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जामखेड शहरातील विविध शाळा काॅलेज, पोलिस स्टेशन, महाविद्यालयांना निवेदन देत रोडरोमिओवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षापासून पाश्चात्त्य संस्कृतीच्या विळख्यात येऊन तरुण पिढी बरबाद होऊन हिंदू संस्कृतीचा र्हास होत आहे. विकृत संकल्पनेमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहेत. व्हॅलेंटाईन ‘डे’च्या नावाखाली प्रेमाचे विभत्स सादरीकरण केल्या जाते. तसेच एकतर्फी प्रेमप्रकरणातून हिंसक कृत्य छेडछाड आणि बलात्कारासारख्या घटना घडत घडतात. 14 फेब्रुवारीला तरुण तरुणींवर प्रभाव पाडण्यासाठी शाळा कॉलेज महाविद्यालयाच्या आवारात अवैधपणे गाड्या चालवतात. तसेच एकतर्फी प्रेमातून मुलीवर दबाव टाकतात.
म्हणून 14 फेब्रुवारी रोजी शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात गस्त वाढवून रोड रोडरोमिओवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.