लॉक डाऊन वाढल्याने प्रवासी रेल्वे गाड्या १७ मेपर्यंत रद्द

नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता आज केंद्र सरकारतर्फे लॉक डाऊनचा तिसरा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन हा येत्या १७ मेपर्यंत लागू असणार असून या कालावधीत नागरी वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. असं असलं तरी देशव्यापी लॉक डाऊनमुळे इतर राज्यांमध्ये अडकलेल्या कामगार, विद्यार्थी व यात्रेकरूंसाठी सरकारतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

देशव्यापी लॉक डाऊनमुळे नागरी वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्या बंद असल्या तरी परप्रांतात अडकलेल्या कामगार, विद्यार्थी व यात्रेकरूंना ‘श्रमिक’ या विशेष रेल्वे गाड्यांमधून त्यांच्या मूळ राज्यामध्ये सोडले जाणार आहे. परराज्यात प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी सरकारतर्फे पास उपलब्ध करून देण्यात येणार असून हा पास प्राप्त झाल्यानंतरच त्यांना प्रवास करता येणार आहे.

श्रमिक रेल्वे गाड्यांबाबत माहिती देताना रेल्वे मंत्रालयाने आजपासून लिंगमपल्ली ते हतिया, अलुवा ते भुवनेश्वर, नाशिक ते लखनौ, नाशिक ते भोपाळ, जयपूर ते पटना आणि कोटा ते हतिया या रेल्वेगाड्या धावणार आहेत.

याखेरीज मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांचा प्रवास हा अबाधित राहणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.