पुणे : खडकवासला धरणापाठोपाठ आता पानशेत धरणही 99 टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संतततधार सुरूच असल्याने पानशेत धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. धरणातून 2 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. पानशेतमधून यंदा पहिल्यांदाच पाणी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून 16 हजार 200 क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुठा नदीला पूर आला असून शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.