पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र! ‘हि’ केली मागणी

बीड: माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. बीड जिल्हयातील बंद असलेले कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे शासकीय कापूस खरेदी केंद्रे पूर्ववत सुरू करणे बाबत व शेतकऱ्यांच्या खरेदीचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

मराठवाड्यात मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. त्यात महाराष्ट्रासह मराठवाड्यात झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून उताराही घटल्याने खाजगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतक-यांची आर्थिक पिळवणूक व नुकसान होवू नये म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महारसंघाने २७ नोव्हेंबर पासून केली होती. बीड जिल्ह्यात साधारण २४ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली तथापि ती सर्वच खरेदी केंद्र आता २० जानेवारी पासून बंद झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावाने.खाजगी व्यापार्यांना कापूस विकावा लागत आहे, परिणामी शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रात विक्री केलेल्या साधारण ३१ हजार शेतक-्यांपैकी १० हजार शेतक-्यांना त्यांचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. पाऊस नसल्याने अगोदरच दुष्काळी परिसिथिती आणि त्यातच खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान व पिळवणूक थांबवण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा, अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.