“जर्सी’त शाहिद कपूरसोबत झळकणार पंकज कपूर

बॉलिवुड अभिनेता शाहिद कपूर याचा या वर्षी “कबीर सिंह’ हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर तो आपल्या आगामी “जर्सी’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. हा चित्रपट स्पोर्टस ड्रामावर आधारित असून त्याचे शूटिंग काही दिवसांतच चंदीगढ येथे करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात शाहिदसोबत त्याचे वडिल पंकज कपूर सुद्धा झळकणार आहेत.

या चित्रपटात पंकज हे एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. यात ते शाहिदचे गुरूच्या भूमिका बजावित आहेत, जे चित्रपटात शाहिदच्या भूमिकेला सहाय असणार असून ते जास्त वय असतानाही क्रिकेटमध्ये वापसी करण्यासाठी प्रयत्नशील असतात.

या चित्रपटाचा हिस्सा बनल्याने उत्साहित असलेले पंकज म्हणाले, मी या चित्रपटात काम करणार असल्याने खूपच उत्साहित आहे. “जर्सी’ची कथा खूपच दमदार असून यात इमोशनल स्टोरी आहे. तसेच शाहिद सोबत काम करणेही दिलचस्प ठरले आणि मी त्याच्या अभिनयाची प्रशंसा करू इच्छितो.

दरम्यान, दिग्दर्शक गौमत टिन्नानूरी यांच्या “जर्सी’त शाहिदच्या ऑपोजिट मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या “जर्सी’चा हिंदी रीमेक आहे. तेलुगू चित्रपटात नवीन बाबू घंटा उर्फ नानी यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.