मुंबई – अभिनेत्री श्वेता तिवारीच्या स्टाइलची आणि लुकची नेहमीच चर्चा होत असते. वयाच्या चाळीशीनंतर तेच सौंदर्य तरुणींना लाजवेल असे आहे. श्वेताप्रमाणे तिची लेक पलक तिवारीने देखील बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. याआधी पलक सलमान खानच्या ‘किसीका भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता पलक एका आंतरराष्ट्रीय ब्रँडची अॅम्बेसेडर बनली आहे. विशेष म्हणजे पलक तिवारी ब्रँडची पहिली भारतीय अॅम्बेसेडर बनली आहे.
पलकला यूएस पोलो एस्सन या परदेशी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आली आहे. यूएस पोलो असोसिएशनच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने एका व्हिडीओद्वारे याची घोषणा केली आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, ‘अमेरिकेतील पोलोसाठी आमची पहिली महिला वेअर ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पलक तिवारीसोबतचा कोलॅब्रेशन करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे.’ या व्हिडीओमध्ये पलक यूएस पोलोच्या वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पलक ‘बिजली बिजली’ या गाण्यातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. याचे कारण म्हणजे अनेकदा यांना एकत्र पाहण्यात आल्याने हा अंदाज लावला जात आहे. मात्र अद्याप या दोघांनी आपल्या नेत्याबाबत कोणतीही अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही.