पाकिस्तानी घुसखोराला सीमेलगत अटक

जम्मू : भारतीय सुरक्षा जवानांनी गुरूवारी आंतरराष्ट्रीय सीमेलगत एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. ती कारवाई जम्मू जिल्ह्यातील अखनूर क्षेत्रात करण्यात आली.

घुसखोर अल्पवयीन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्याने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी गांभीर्याने घेण्यात आली आहे. त्याची सुरक्षा दलांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरच्या किश्‍तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या संशयावरून चौघांना अटक करण्यात आली. ते हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेबाबत सहानुभूती बाळगून असल्याची माहिती पुढे आली आहे. दोडा आणि किश्‍तवाड जिल्ह्यांमध्ये दहशतवादाचे पुनरूज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. ते हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दलांकडून जोरदार मोहीम राबवली जात आहे. त्यातूून आतापर्यंत 16 दहशतवादी आणि संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.