पाकिस्तानने दाखवला बनावट नकाशा; बैठकीतून भारताचा सभात्याग

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीतून भारताचा सभात्याग

नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीमध्ये पाकिस्तानच्या सदस्याने बनावट नकाशा दाखवल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय प्रतिनिधींनी निषेध व्यक्‍त करण्यासाठी या बैठकीतून सभात्याग केला. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने दाखवलेल्या नकाशामध्ये भारतीय भूभाग पाकिस्तानच्या हद्दीमध्ये दर्शवण्यात आला होता.

सल्ल्याकडे आयोजकांकडून अक्षम्य दुर्लक्ष केले गेले आणि सभेच्या निकषांचेही उल्लंघन केले गेले. त्यामुळे आयोजकांशी चर्चा करून भारताने निषेध व्यक्‍त करण्यासाठी या बैठकीतून सभात्याग करण्याचा निर्णय घेतला, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ही बैठक रशियाच्या अध्यक्षतेखाली होती. अगदी वाटले होते, त्याप्रमाणे पाकिस्तानने या बैठकीमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.

पाकिस्तानची ही कृती निर्लज्जपणे शांघाय सहकार्य संघटनेच्या सनदेचे आणि या संघटनेचे सदस्य असलेल्या देशांच्या भौगोलिक एकात्मता आणि सार्वभौमत्वाच्या सुरक्षेबाबत प्रस्थापित असलेल्या सर्व निकषांचे उल्लंघन करणारी आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.